मुंबई:- पोलिस होण्याचे हजारो तरुणांचे स्वप्न असते. पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने पोलिस भरती जाहीर केली आहे. १५ हजार ६३१ पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान आता यासाठी अर्जप्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे.
पोलिस भरतीची अर्जप्रक्रिया २५ सप्टेंबरपासून सुरु केली जाणार आहे. यामध्ये विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्यामुळे आता पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता या तरुणांसाठी अर्जप्रक्रिया सुरु होणार आहे.
पोलिस भरतीचे प्रशिक्षण देण्याासठी अनेक अकॅडमी आहेत. या अकॅडमीमध्ये हजारो उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत. याचसोबत वैयक्तिक स्वरुपात भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांची संख्यादेखील अधिक आहे. याच तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.
यंदा १५ हजारांपेक्षा जास्त पदांसाठी पोलिस भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी राज्यातून १६ लाख तरुणांचे अर्ज येतील, असं सांगण्यात येत आहे. या भरतीप्रक्रियेची सुरुवात गणपतीनंतर सुरु केली जाईल, असं सांगितलं होतं. त्यानंतर आता २५ सप्टेंबरपासून अर्जप्रक्रिया सुरु होणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी मैदानी चाचणी ही पावसाळ्यानंतर होणार असल्याचे सांगितले होती. मैदानी चाचणी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. तर लेखी परीक्षा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
वयोमर्यादेत नसलेल्यांनाही एक संधी
या पोलिस भरतीमध्ये २०२२, २०२३, ३०२४, २०२५ या वर्षात ज्या उमेदवारांची वयोमर्यादा संपली तर त्यांना संधी देण्यासाठी निर्णय दिला आहे. त्यामुळे पोलिस भरतीसाठी उमेदवारांची संख्या वाढेल. याचसोबत भरतीच्या अर्जाचे शुल्क जाहिर करण्यात आले आहेत.
कशी होणार निवड:
मैदानी चाचणी
मैदानी चाचणीत ४० टक्के गुण अनिवार्य
लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवारांची निवड
लेखी परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न
मुंबई सोडून राज्यभरात एकाचवेळी होणार लेखी परीक्षा