Murder News: एकाच परिवारातील 4 जणांची हत्या

Bhairav Diwase



छत्तीसगड:- छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील ठुसेकेला गावात एकाच परिवारातील चार जणांची हत्या करण्यात आली. 4 दिवसांनी घरातून दुर्गंध येऊ लागल्यावर या घटनेचा खुलासा झाला आहे. पोलिसांनी प्रवेश केल्यावर घरात ठिकठिकाणी रक्ताचे डाग दिसून आले. बुधराम उरांव आणि त्यांच्या पत्नीसमवेत 4 जणांचे मृतदेह घरातच पुरण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घरात फॉरेन्सिक तपासणी केल्यावरच चित्र स्पष्ट होणार आहे.

सविस्तर वृत्त असे की, छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील खरसिया तहसीलजवळील ठुसेकेला गावातून भयानक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील चार जणांची घरातच हत्या करण्यात आली होती, जी चार दिवसांनी घरातून आलेल्या असह्य दुर्गंधीमुळे उघडकीस आली. घटना गावातील राजीव नगर परिसरात घडली. बंद घरातून येणाऱ्या दुर्गंधीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले. स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर घराची खोली उघडण्यात आली, जिथे विविध ठिकाणी रक्ताचे ठिपके आणि भयानक दृश्य दिसून आले.
प्राथमिक तपासात पोलिसांनी हा प्रकार हत्येशी संबंधित असल्याचे सांगितले. बुधराम ओरांव आणि त्यांची पत्नी, तसेच मुलासह चार जणांचा मृतदेह घराच्या खोलीत पुरल्याची शंका व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमची मागणी केली असून, त्यांनी मृतदेह जमिनीत गाडले आहेत की नाही, याची सखोल चौकशी करणार आहेत.