चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आणि विशेषतः पत्रकार वर्तुळात सध्या एकच प्रश्न आहे. जिल्ह्याच्या विकासाचा पुढचा टप्पा कोणता? आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर, पत्रकारांनी त्यांना जिल्ह्याच्या प्रगतीबद्दल आणि आगामी प्रकल्पांबद्दल प्रश्न विचारला. 'जिल्ह्याच्या प्रगतीबद्दल तुम्ही काय सांगाल आणि येत्या काळात काही नवीन प्रोजेक्ट जिल्ह्यात येणार आहेत का?' असा थेट प्रश्न एका पत्रकाराने त्यांना विचारला.
मात्र, या प्रश्नावर पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यांनी प्रश्नाचे उत्तर देणे टाळले आणि पत्रकारांना फक्त 'नमस्कार' करून पुढे निघून गेले.
पालकमंत्र्यांच्या या कृतीमुळे आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर सरकार गंभीर नाहीये का? किंवा विकासासाठी काही नवीन योजनाच नाहीत का? पालकमंत्री का गप्प राहिले, याची चर्चा आता सर्वत्र होत आहे. चंद्रपूरच्या विकासाला पालकमंत्र्यांचा 'नमस्कार' आता चर्चेचा विषय बनला आहे.