Udaan Laibary : उड़ान अकॅडमीच्या नवीन अभ्यासिकेचे उद्घाटन

Bhairav Diwase
चंद्रपूर:- स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ओळखल्या जाणाऱ्या उड़ान अकॅडमीने आपली नवीन अभ्यासिका (क्लास रुम जवळ) सुरू केली आहे. स्वातंत्र्य दिनाचा दिवस हा भारताच्या प्रगतीचा आणि भविष्याचा प्रतीक आहे, आणि त्याच दिवशी शैक्षणिक क्षेत्रातही एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. उड़ान अकॅडमीच्या नवीन अभ्यासिकेचे उद्घाटन संचालक, इंजिनिअर जितेंद्र पिंपळशेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या नवीन अभ्यासिकेमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अधिक चांगली जागा मिळणार आहे.
Click Here 👇 👇 
यावेळी बोलताना संचालक इंजिनिअर जितेंद्र पिंपळशेंडे यांनी आशा व्यक्त केली की, या नवीन अभ्यासिकेतून अनेक विद्यार्थी घडतील आणि ते आपल्या देशासाठी योगदान देतील. त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या. या उद्घाटन सोहळ्याला उड़ान अकॅडमीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नवीन सुविधेमुळे विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल.

शाखा...

१) उड़ान अभ्यासिका  ( जेट कंप्युटर मागे गुरुद्वारा रोड, तुकूम चंद्रपूर)

२) उड़ान अभ्यासिका ( जुना क्लास, मातोश्री शाळेजवळ,ताडोबा रोड तुकूम चंद्रपूर)