ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी तालुक्यातील अर्हेरनवरगाव येथील ५३ वर्षीय व्यक्तीचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.१५) सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली. अरुण तुळशीराम ठेंगरे असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अरूण ठेंगरे हे गुरूवारी (दि.१४) पहाटे नेहमीप्रमाणे शौचासाठी गावाबाहेरील तलावाच्या पाळीवर गेले होते. मात्र, बराच वेळ झाला तरी ते घरी परतले नसल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. मात्र त्यांचा काही थांगपत्ता लागला नाही. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील एका व्यक्तीला त्यांचा मृतदेह गावाजवळील तलावात तरंगताना आढळून आला. त्यानंतर त्यांनी ही माहिती त्यांच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांना दिली. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याचे अर्हेरनवरगाव बिट जमादार अरुण पिसे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. घरातील कर्त्या पुरुषाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे ठेंगरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.