चंद्रपूर:- आरक्षणाच्या मुद्यावर न्यायालयाने निवडणुकीला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस नगर पालिकेतील ३, मूल व गडचांदूर येथील प्रत्येकी एक अशा पाच प्रभागातील निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे या पाच प्रभागातील निवडणूक कधी होईल याबाबत संभ्रमावस्था आहे.
🌄
जिल्ह्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. प्रचार ऐन रंगात आला असतानाच आता जिल्ह्यातील घुग्घुस नगर पालिकेतील ३ प्रभाग व मूल आणि गडचांदूर येथील प्रत्येकी एक अशा पाच प्रभागातील निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे.
🌄
स्थगित झालेल्या निवडणुकीत गडचांदूर नगर पालिकेतील प्रभाग क्रमांक ८ ब सर्वसाधारण महिला व मूल पालिकेतील प्रभाग क्रमांक दहा ब सर्वसाधारण तसेच घुग्घुस येथील प्रभाग ५ मधील ब , ७ मधील अ व प्रभाग ९ अ या जागांचा समावेश आहे.
🌄
उमेदवारांनी आक्षेप घेतला त्यामुळे या सर्वांनी न्यायालयात दाद मागीतली. न्यायालयाचा निकाल आला मात्र निवडणूक आयोगाचा अंतिम निकाल आला नाही. त्यामुळे आता या सर्व निवडणुकींना पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे.

