Chandrapur News: वडेट्टीवार आणि धानोरकर एकाच मंचावर; भाऊंच्या दांडियात वडेट्टीवारांची हजेरी!

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
चंद्रपूरच्या राजकारणात एकमेकांचे विरोधक म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर एकाच मंचावर पाहायला मिळाले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्षाची चर्चा रंगली होती. मात्र, आता भाऊंच्या दांडिया उत्सवात दोन्ही नेते एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रपूर शहरात भाऊंच्या दांडियाचं आयोजन करतात. यंदा या दांडिया उत्सवात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे, प्रतिभा धानोरकर यांच्या राजकीय विरोधकांमध्ये वडेट्टीवार यांचं नाव घेतलं जात होतं. त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईत विजय वडेट्टीवार यांनी प्रतिभा धानोरकर यांच्यासोबतचा राजकीय संघर्ष संपवून एकत्र येण्याची भूमिका मांडली होती. त्यानंतर धानोरकर यांनी आयोजित केलेल्या दांडिया उत्सवात वडेट्टीवार सहभागी झाल्याने दोन्ही नेत्यांमधील संबंध सुधारण्याचे संकेत मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.