कर्करोग पीडीत रुग्णाच्या उपचारासाठी जिल्हा परिषदेने केली १५ हजाराची आर्थिक मदत.

Bhairav Diwase
जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी आरोग्य विभागाला तात्काळ मदत करण्याचे दिले होते निर्देश.
Bhairav Diwase.   May 17, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:-  दवाखान्याचा खर्च म्हटले की, सामन्यांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहतो. त्यातही कर्करोगासारखा दुर्धर आजार असला तर माणूस प्रकृतिपेक्षा पैशानेचं अगोदर खालावत जातो. अशा परिस्थितीत पीडितासह कुटुंबीयांना कुण्या पुण्यवंताकडुन मदत व्हावी अशी अपेक्षा असते. आणि त्यातही आज जगात कोरोणा महामारीने संपूर्ण जगात हाहाकार माजवून असल्याने आपल्या दीर्घाजाराची व्यथा कुणी ऐकेल का? हा प्रश्न सतत पीडिताला भेडसावत असतो. याचीच प्रचिती सावली येथील नागसेन कॉलनीत राहणार्‍या सौ. मिराबाई तुकाराम कोंडेकर या वृद्धेला आली.
संपूर्ण देशात संचारबंदी लागू असल्याने हाताला काम नाही. आणि त्यात कर्करोगासारख्या आजारावर उपचारासाठी आर्थिक कुवत नसल्याने सौ. मिराबाई कोंडेकर यांची चिंता वाढली होती. परंतु म्हणतात ना, कुणीही नसतो तेव्हा परमेश्वर पाठीराखा असतो. असेच काहीसे सावलीत घडले.
सदरहू पीडितेची माहिती होताचं स्थानिक नगरसेवक चंद्रकांत संतोषवार व भाजपा तालुका महामंत्री सतीश बोम्मावार यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांना संपूर्ण परिस्थिती अवगत करून दिली. आणि नेहमीप्रमाणेचं पिडितेच्या मदतीसाठी अध्यक्षा सौ. गुरनुले पुढे सरसावल्या.
त्यांनी सदर प्रकाराची लगेच दखल घेत जि. प. आरोग्य विभागाला सूचना देऊन संबंधित पीडीतेला तात्काळ मदत पुरविण्याचे निर्देश दिले.
काल शनिवार, (१६/५) ला आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित कर्करोग पीडिता सौ. मिराबाई तुकाराम कोंडेकर यांचे घर गाठून त्यांना १५,०००/- रूपयांची आर्थिक मदत केली.
यावेळी, अशा कठीण परिस्थितीतही विशेष दखल घेऊन आपल्याकडून झालेल्या मदतीबद्दल आम्ही आपले आभारी आहोत! अशा भावना कोंडेकर परिवारानी व्यक्त केल्या.