Click Here...👇👇👇

चंद्रपूर जिल्हा कोरोनाने आज 2 मृत्यू.

Bhairav Diwase
आज जिल्हात 96 पॉझिटिव्ह रुग्णांची भर.
Bhairav Diwase. Aug 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर

चंद्रपूर:- जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रकोप वाढतच असून आज 26 ऑगस्टला 2 करोना बधितांचा मृत्यू झाला तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1667 झाली आहे. यापैकी 1068 बाधित उपचारानंतर बरे झाले आहेत तर 579 जण उपचार घेत आहेत.


बुधवार 26 ऑगस्ट ला एकूण 96 बाधित पुढे आले आहेत.


आज कोरोना मुळे 02 इसमांचा मृत्यू झाला असून यात चामोर्शी येथील एक 52 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे, कोरोना सह श्वसनाचा आजार तसेच न्युमोनिया असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या व्यक्तीने 25 ऑगस्ट च्या सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारादरम्यान आपले श्वास सोडले.



तर राणीलक्ष्मी वार्ड बल्लारपूर येथील एक 55 वर्षीय महिला ने सुद्धा 26 ऑगस्ट ला 12.30 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आपले प्राण सोडले. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 20 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ज्यात 1 रुग्ण तेलंगाणा, 1 बुलढाणा तर एक गडचिरोली जिल्ह्यातील रुग्णाचा समावेश आहे .