Click Here...👇👇👇

तलावापासून ते मारिया कॉलेज कडे जाणारा मुख्य रस्ता दुरुस्ती करून दुर्गंधीमुक्त करण्यात यावा.

Bhairav Diwase
उलगुलान संघटने द्वारा मुल नगर प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
Bhairav Diwase. Aug 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- मुल नगर परिषदे अंतर्गत येणाऱ्या रामपूर तुकूम वार्ड क्रमांक -१ मारिया महाविद्यालया जवळील रहिवाशांना जाण्या येण्याकरिता जो रस्ता आहे तो रस्ता अतिशय खराब झालेला असून मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडलेले आहेत. संपूर्ण रस्ता चिखलमय झालेला असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. त्याच रस्त्याच्या बाजूला झोपडपट्टी असल्यामुळे तेथील रहिवाशी रस्त्याच्या मधोमध शौचालयास बसतात त्यामुळे रस्त्यामधून जाताना मोठ्या प्रमाणात दुर्गंधी व घाण असते. या घाणीमुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता आहे. अतिशय कठीण परिस्थितीत या भागातील रहिवासी या रस्त्याने येणे-जाणे करत आहेत. ही बाब अतिशय गंभीर असून यावर तात्काळ उपाय योजना करुन सदर रस्ता सुरळीत करण्यात यावा व याठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्यात यावा अशी मागणी उलगुलान संघटना शाखा मूल द्वारा मुख्य कार्यकारी अधिकारी मुल यांच्याकडे करण्यात आली.
सदर मागणीची तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर रस्त्याची पुनर्बांधणी करावी व परिसर दुर्गंधीमुक्त करण्यात यावा अन्यथा उलगुलान संघटना आक्रमक पवित्रा घेणार व परिसरातील नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन करणार असा इशारा उलगुलान संघटनेद्वारे देण्यात आला.
निवेदन देताना उलगुलान संघटनेचे शाखा अध्यक्ष निखिल वाढई, प्रणित पाल, आकाश येसनकर, सुजित खोब्रागडे, रोहित शेंडे, कुंदन कस्तुरे, शुभम उराडे,  तथा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.