Bhairav Diwase. Aug 26, 2020
राजुरा:- मागील आठवड्या भरात कोरोना संकट ने विरुरात कहर माजवीत पाच रुग्ण पोजिटिव्ह आढल्यामुळे कोविड महामरीचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी विरुर ग्रामपंचायत व व्यापरी विरुर असोशीयन यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवार बाजार असलेल्या दिवशी एक दिवसाचा जनता कर्फ्यु लागू करण्यात आला यावेळी विरुर येथील संपूर्ण बाजारपेठ व आठवडी बाजार बंद करून जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मात्र काही अवैध रित्या तेलंगणातून येत असलेल्या गाड्या विषयी नागरिकांत कमालीची नाराजी दिसली,
आज झालेल्या विरुर येथील अँटीझेन टेस्ट मध्ये सर्वच संशयित हे निगेटिव्ह निघाल्याने थोडा दिलासा मिडला परंतु यासमोर अधिकच सावधगिरी बाडगून रोजचा दैनदिन व्यवहार करावा व जे पोजिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले असेल त्यांनी स्वतः समोर येऊन स्वतःची टेस्ट करून घ्यावे असे आव्हान प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली चे डाँ मुन यांनी केले आहे.