Bhairav Diwase. Aug 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील व्याहाड खु. येथे दुचाकी ने झालेल्या अपघातात जीबगाव येथील राहुल कीसन बोरकुटे 38 याचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला अंबादास नागापुरे रा. जीबगाव हा जखमी झाला आहे. दोघेही आपल्या दुचाकीने सायं. 7.30 च्या दरम्यान जीबगाव कडे जात असताना व्याहाड खु. येथील नवनिर्माणाधीन रस्त्याच्या अर्धवट दुभाजकावर दुचाकी आदळुन विरूध्द दिशेने येणाऱ्या ट्रक ला धडक दिली. यात मृताच्या तोंडावर ट्रक चा हुक शीरून तो जागीच गतप्राण झाला. पुढील तपास सावलीचे पोलीस करीत आहेत.