नामदार दादासाहेब भुसे कृषिमंत्री यांना दिले निवेदन.
कृषीतज्ञाद्वारे सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याची केली मागणी.
Bhairav Diwase. Aug 25, 2020
चिमूर:- चिमूर विधानसभा क्षेत्रात मोठया प्रमाणात लागवड करण्यात आलेल्या सोयाबीन शेत पिकावर लष्करी अळी व अन्य रोगाच्या प्रादुर्भावमुळे कृषी संशोधकाकडून सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी कृषिमंत्री नामदार दादासाहेब भुसे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभा क्षेत्रात नगदी पीक म्हणून असलेले सोयाबीन पीक असून चिमूर ,नागभीड सह वरोरा भद्रावती
तालुक्यात लागवड केल्या जाते .
कोरोना परीस्थिती असल्याने शेती व्यवसाय करणे अत्यंत आवश्यक आहे चिमूर तालुक्यात ५ ते ६ हजार हेक्टर शेतीत जेएस ३३५ या सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आली सोयाबीन पिकाची वाढ सुयोग्य स्थितीत असताना मात्र आगस्ट २० च्या सतत पावसामुळे व वातावरण बदला मुळे सोयाबीन पिकावर लष्करी अळी व इतर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल होण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा स्थानिक कृषी अधिकारी यांचे शी संपर्क करून त्या रोगावर आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी सांगितले
दरवर्षी सरासरी प्रति १२ ते १५ क्विंटल एकरी सोयाबीन उत्पन्न होत असताना यावर्षी मात्र प्रती ५ ते ६ क्विंटल एकरी सोयाबीन होण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्ग चिंतातुर व शोकाकुल अवस्थेत आहे
येनकेन अस्मानी तर सुलतानी संकटामुळे परिसरातील सतत घटणारे सोयाबीन उत्पन्न या प्रकरणी शासनाने तात्काळ कृषी संशोधका करून चिमूर व बाधित क्षेत्रात भेट देऊन सविस्तर सर्वेक्षण करून उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे अन्यथा महाराष्ट्र मधील अन्य भागाप्रमाणे पूर्व विभागात सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर वरोरा या तालुक्यातील मोठया प्रमाणात लागवड केलेल्या सोयाबीन शेत पिकावरील लष्करी अळी व इतर रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कृषी संशोधकडून सर्वेक्षण करून आर्थिक मदत देण्याची मागणी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी कृषीमंत्री नामदार दादासाहेब भुसे यांना दिलेल्या निवेदनातून केलेली असून कृषी आयुक्त पुणे, विभागीय आयुक्त नागपूर, जिल्हाधिकारी चंद्रपूर ,विभागीय सहसंचालक नागपूर, जिल्हा कृषी अधीक्षक चंद्रपूर यांना सुद्धा प्रति निवेदन दिलेले आहे.