Click Here...👇👇👇

गोंडपिपरी तालुक्यातील नादुरुस्त रस्त्यांमुळे वाहन चालक त्रस्त.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Aug 25, 2020
(संग्रहित छायाचित्र)
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील नंदवर्धन ते शिवनी देशपांडे ते पनोरा गावातील रस्त्यांची वाट लागलेली आहे जागोजागी लहान मोठे खड्डे पडल्याने वाहन धारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व मार्गातील रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्यानेच हे सर्व रस्ते खराब होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांना मधून होत आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या कामाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.
पावसाळ्यात तर या रस्त्यांवर वाहन चालविणे धोक्याचे झाले आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्यांची दुरुस्ती देखील करण्यात आलेली नाही. लोकसभा, विधानसभेची निवडणूक आली की सर्व उमेदवार हात जोडून मत मागण्यासाठी गावात येतात, आश्वासन देतात, निवडून आले की गावाचं नाव तर विसरतच पण गावातील समस्या काय आहे आणि कोणत्या या गोष्टी विजयी उमेदवार विसरून जातात आणि पाच वर्षात फिरून सुद्धा पाहत नाहीत असा समाजा भिमुख प्रश्न येथील स्थानिक गावकऱ्यांनी केला आहे.
खड्डेमय रस्त्यांमुळे दैनिक प्रवास करणाऱ्या वाहन चालकास व प्रवाशांना शारीरिक व्याधींचा त्रास वाढला आहे. अनेकांमध्ये पाठीचे व मानेचे दुखणे बडावले आहे. गरोदर माता व वृद्धांसाठी हे रस्ते पार करणे म्हणजे महिलाचा दगड ठरत आहे, रात्री-अपरात्री हे रस्ते वाहनांसाठी आणि वाहन चालकासाठी घातक ठरत आहे त्यामुळे या सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे