Click Here...👇👇👇

ग्रामसेवक निखारेंना सन्मानाचा निरोप, ग्राम पंचायत आष्टा ने केला सपत्निक सत्कार.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Aug 25, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- ग्राम विकासाचा मुख्य केंद्रबिंदू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था ग्राम पंचायत चा ग्रामसेवक हा विकासाचा मुख्य धागा माणल्या जातो. अशाच एका कर्तव्यनिष्ठ ग्रामसेवकाचा सत्कार समारंभ आष्टा ग्राम पंचायतने घडवून आणला. सप्टेंबर २०१५ ते ऑगस्ट २०२० पर्यंत सलग पाच वर्षे निष्ठेने सेवा देणाऱ्या ग्रामसेवक अनिल निखारे यांचा शाल श्रीफळ, ड्रेस मटेरीयल, साडीचोळी व एक चांदीची मुर्ती भेंट देऊन ग्राम पंचायत आष्टा ने सपत्निक सत्कार करून अनिल निखारेंनी केलेल्या कामाची जणू पावतीच दिली.

माहे सप्टेंबर २०१५ मध्ये अनिल निखारे आष्टा ग्राम पंचायतीवर ग्रामसेवक म्हणून रूजू झाले. त्या कार्यकाळापासून विविध लोकोपयोगी योजना राबवून आष्टा ग्राम पंचायतीला प्रगतीपथावर नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. तालुकास्तरावरील स्मार्ट ग्राम, जिल्हा स्तरावरील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, ते केंद्रीय दिनदयाल उपाध्याय ग्राम पंचायत सक्षमिकरण पुरस्कार मिळवून आपल्या सक्षम कार्याची ग्वाही दिली. यात सरपंच हरीष ढवस व ग्राम पंचायत सदस्यांचे तेवढेच सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याचे ग्रामसेवक अनिल निखारेंनी स्पष्ट कबुली दिली. याप्रसंगी गावातील जेष्ट नागरीक, पोलिस पाटील भाऊराव पिंपळशेंडे, प्रदिप दिवसे व पत्रकार दिलीप मॅकलवार उपस्थित होते.