गावातील महिलांची तहसील कार्यालय कोरपना येथे तक्रार.
Bhairav Diwase. Aug 10, 2020
कोरपना:- कोरपना तालुक्यातील इरई (बोरगाव) येथे स्नेहहीत आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्था गडचांदूर र.न.162 मार्फत स्वस्त रेशन धान्य दुकान सुरू आहेत,तसेच रेशनचे वाटप सुद्धा बचत गटातील महिला पदाधिकारी करीत आहे.
परंतु गावातील अनेक नागरिकांना सदर महिला बचत गटाच्या मार्फत नियमित रेशन पुरवठा होत नसल्यामुळे गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे,तसेच रेशन कार्ड वरील युनिट प्रमाणे रेशन मिळत नसल्याच्या सुद्धा महिलांचा आरोप आहे.
रेशन धान्य दुकानात गेल्यास पंचिंग मशीन वर अंगठा घेऊन त्यांची पावती सुद्धा त्यांना देत आहे परंतु कधी कधी अन्नधान्य संपले असे कारण सांगून रेशन देत नाही अशी माहिती गावातील एका महिलांनी दिली
त्यांनी सदर बाब ही भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या निदर्शनास आणून दिली त्यांनी गावातील महिलांसोबत नायब तहसीलदार व तहसील कार्यालय येथील पुरवठा निरीक्षक यांना निवेदन देऊन सदर प्रकरणाची चौकशी करून उचित कार्यवाही करण्याबाबत निवेदन दिले.तसेच पुढील आठवड्यात सदर प्रकरणाची चौकशी करू अशी माहिती यावेळी पुरवठा निरीक्षक यांनी दिली.
यावेळी भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने,युवा नेते दिनेश खडसे,सत्यवान चामाटे, विजेता गेडाम,रविंद्र आत्राम,अनिता तेलंग,वर्षा वरारकर,शांताबाई निखाडे,सविता पिदूरकर, मंजुळा आत्राम,संगीता किनाके,बहिणाबाई भोयर,सुचिता आत्राम उपस्थित होत्या.