Bhairav Diwase. Aug 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुका हा कोरोना पासून लांब असतांनाच आता चांगलाच शिरकाव केल्याचे चित्र पहावयास मिळत असून आज दिनांक 26 ला एकाच दिवशी सावली तालुक्यात सायंकाळी पर्यंत 20 जण कोरोना बाधीत रुग्ण मिळाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मडावी यांनी दिली असून त्यातील पाथरी येथील । , व्याहड बूज । 8 , सामदा । जण असे एकूण 20 जण मिळाल्याने चांगलीच खळबळ माजली असून आरोग्य यंत्रणा पुन्हा सतर्क झालेली आहे.व्याहड बूज येथील एकाच परिवारात संख्या जास्त असल्याची माहिती पुढे येत असून नागरिकांनी जागरूक राहून आरोग्य विभाग व प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान करण्यात येत आहे.सतर्कता म्हणून व्याहड बूज बंद ठेवण्यात येणार आहे .