चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंती साजरी.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Oct 03, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- स्थानिय चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा जि. चंद्रपुर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. डॉ एन. एच. पठाण सरांनी उपस्थितांना महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला. 

         त्यावेळी उपस्थित काॅलेजचे प्राचार्य डाॅ. एन. एच. पठाण यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बावनकुळे सर, तसेच उपस्थित घोडेस्वार सर, उगेमुगे सर, चौधरी सर, विरूटकर सर, नरावाडे मॕडम, डोनेवार सर, अल्याडवार बाबू, कटारे बाबू व शिक्षककेत्तर कर्मचारी उपस्थित होते.