पालकमंत्री नामदार विजयभाऊ वडेट्टीवारांनी केली आदिवासी बांधवांची "गोड दिवाळी".

Bhairav Diwase
क्षेत्रातील आदिवासीबहुल गावात मिठाई वाटपाचा पालकमंत्री श्री विजयभाऊ वडेट्टीवार यांचा स्तुत्य उपक्रम.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- हिरव्यागार वनराईच्या संगतीने आयुष्याचे गीत गात आपल्या मोजक्या साधनसह आदिवासी बांधव एका वेगळ्या संस्कृतीचे जतन करीत असतात. वनाच्या सरंक्षणाच्या बरोबरच देशाचे मूलनिवासी असल्याची जाणीव ठेवत आपले पारंपरिक व्यवसाय करून ते आपली गुजराण करीत असतात. आजही आदिवासी समूह बऱ्याच अडचणींना तोंड देत आयुष्याशी दोन हाथ करतो आहे. 

               सर्वसमावेशक राजकारण करीत समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न कायम नामदार विजयभाऊ करीत आले आहेत.अशा दुर्गम आदिवासीबहुल गावात राहणाऱ्या बांधवांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देश्याने आदरणीय नामदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी एक स्तुत्य उपक्रम यंदाच्या दिवाळीमध्ये राबविला.
            ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील दुर्गम तांड्या- वस्तीत राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या गावात भेट देत प्रत्येक घरी मिठाई वाटप करून त्यांच्या समवेत नामदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी यंदाची दिवाळी साजरी केली.
         सिंदेवाही तालुक्यातील कारगाटा, जाटलापूर,पवनपार,चिटकी, फुटकी, गोविंदपूर, मुरपार, घोट, खातेरा, पांगडी, कारवा, पांडरवानी, खांडला, सरांडी, पुरकेपार, चिखलमिनघरी या आदिवासीबहुल गावामध्ये दिवाळी सणाला गावातील प्रत्येक कुटुंबाला मिठाई प्रदान करीत आदिवासी बांधवांची दिवाळी गोड करण्यात आली.याच निमित्याने आदिवासी बांधवांच्या स्थानिक प्रश्न, अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा पालकमंत्री विजयभाऊंनी या प्रसंगी केली.सदर कार्यक्रमाला श्री.किशोर गजभिये प्रभारी चंद्रपुर जिल्हा, श्री.रमाकांत लोधे ,तालुकाध्यक्ष, सिंदेवाही तालुका कांग्रेस कमेटी तथा जि.प.सदस्य श्री.संतोषभाऊ रावत अध्यक्ष चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती बँक, सौ.रूपाताई सुरपाम जी. प. सदस्य, , श्री.सुनील उट्टलवार शहर अध्यक्ष, सिंदेवाही, सौ.सीमाताई सहारे तालुकाध्यक्षा सिंदेवाही महिला तालुका कांग्रेस कमेटी, श्री.राहुल पोरेड्डीवार प. स. सदस्य, श्री. वीरेंद्र जैस्वाल माजी तालुकाध्यक्ष, श्री.सचिन नाडमवार अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना,श्री. मयूर सूचक अध्यक्ष युवक कॉंग्रेस,श्री. संजय गहाणे उपाध्यक्ष तालुका काँग्रेस, श्री. सचिन दडमल ,श्री, संतोष हेडाऊ,श्री.अशोक सहारे व गावातील जेष्ठ व युवा काँग्रेस कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने आदिवासी बंधू-भगिनी उपस्थित होते .