चिमूर:- चिमूर येथील टिळक वार्ड निवासी डॉ. सुरेश विठ्ठलराव लाखे यांची मोठी मुलगी कुमारी तेजल सुरेश लाखे (MBBS) हिचे शुक्रवार दिनांक 25 डिसेंबर ला सकाळी 11 वाजता त्यांचे राहते घरी हृदय विकाराने निधन झाले. ती मृत्यूसमयी 20 वर्षाची होती.
तिच्या या अचानक मृत्यमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे. आज शुक्रवारी तिचेवर उमा नदी कवडशी काठावरील हिंदू स्मशानभूमी येथे दुपारी 4 वाजता अंतिम संस्कार करण्यात आले. तिचे पश्चात आजी, वडील, आई, लहान बहीण, लहान भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे.