🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

विद्यापीठाच्या विविध मागण्या घेऊन अभाविप गडचिरोली चे शिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन.


Bhairav Diwase.          Feb 04, 2021
गडचिरोली:- आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी सुपरिचित आहातच. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेल्या 71 वर्षांपासून शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अविरतपणे कार्य करते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही केवळ देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठे छात्र संघटन आहे हे आपण जाणताच.

1)covid-19मुळे रद्द करण्यात आलेल्या परीक्षाचे शुल्क लवकरात लवकर विद्यार्थ्यांना परत करण्यात यावे.

2)दोन फेब्रुवारी ला आपण जो महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय दिला त्या निर्णयांचे अभाविप गडचिरोली स्वागत करते पण आपण म्हटले आहे 50 टक्के महाविद्यालय सुरू करू परंतु जिथे इंटेक कॅपिसिटी पेक्षा विद्यार्थी संख्या कमी आहे तिथे 100 टक्के महाविद्यालय सुरू करण्यात यावे केवळ महाविद्यालय नव्हे तर वसतिगृह व प्रयोगशाळा सुरू करण्यात यावे.

3)संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा विचार करून महाराष्ट्र शासनाने  उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा काढण्या करिता चा कायदा करून महाविद्यालय स्तरांवर ते पाठविण्यात यावा जणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल.

4) विद्यापीठात आधी 5 शैक्षणिक विभाग होते. मागील वर्षी आणखीन सात शैक्षणिक विभाग सुरू करण्यात आले. परंतु वास्तविकतः सद्यस्थितीत असलेली इमारत हे सर्व वर्ग भरवण्यासाठी अपुरी आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने विद्यापीठास सर्व सोई युक्त अद्यावत शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देऊन हे शैक्षणिक संकुल कमीत कमी वेळेत उभे राहावे यासाठी लवकरात लवकर ठोस पावले उचलावीत.

5) सद्यस्थितीत विद्यापीठात एक मुलांचे व एक मुलींचे वसतीगृह आहे. विद्यापीठातील संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात अद्ययावत वसतिगृह तयार करण्यात यावे जेणेकरून विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल.

6) विद्यापीठात प्रशस्त व सर्वसोइयुक्त ग्रंथालय व अभ्यासिकेची आवश्यकता आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.

7) विद्यापीठात सद्यस्थितीत बारा पारंपारिक शिक्षण देणारे पदव्युत्तर विभाग आहेत. परंतु जल, जंगल, जमीन या विषयावर आधारित नवीन कोर्सेस विद्यापीठात सुरू करण्यात यावी जेणेकरून त्याचा फायदा या भागातील विद्यार्थ्यांना होईल.

8) विद्यार्थ्यांमधील उपजतगुण विकसित होण्याकरिता विद्यापीठाने विद्यापीठाचे सर्व सोयीयुक्त क्रीडा संकुल उभारावे ज्याचा फायदा या भागातील विद्यार्थ्यांच्या विकासात होईल.

9) चंद्रपूर व अहेरी येथे विद्यापीठ चे उपकेंद्र उभारण्यात यावे. या उपकेंद्रांमध्ये कौशल विकास देणारे अभ्यासक्रम सुरू करावेत.

10) विद्यापीठात विज्ञान शाखेचे अभ्यासक्रम तर शिकवले जातात परंतु त्यासाठी लागणाऱ्या प्रयोगशाळांची व्यवस्था नाही ही एक शोकांतिका आहे.  त्यासाठी लवकरात लवकर या प्रयोगशाळा उभारण्यात याव्यात.

11)गोंडवाना विद्यपीठ हे जनजातीय क्षेत्रात असल्याने , जनजातीय कला व संस्कृतीचे संवर्धन व जोपासना होण्यासाठी विद्यापीठात जणजातीय वस्तू संग्रहालय व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात यावे.

12)गडचिरोली व चंद्रपूर हा झाडीपट्टी  रंगमंचासाठी ओळखला जातो. त्यामुळेच विद्यार्थ्यांनमध्ये असणाऱ्या कला गुणांची जोपासना व्हावी म्हणून विद्यपीठात एक भव्य सांस्कृतिक सभागृह उभारण्यात यावे.

13) वरील सर्व मागण्या या विद्यापीठाच्या सर्वांगिन विकासासाठी आहेत. वरील मागण्या पूर्ण झाल्यास या जनजातीय दुर्गम व दुर्लक्षित भागाचा विकास होईल. तरीही या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून विद्यापीठाच्या विकासासाठी आपण स्वतः लक्ष घालावे अन्यथा अभाविप तीव्र आंदोलन करेल अशी माहिती गडचिरोली जिल्हा संयोजक अंकुश कुनघाडकर यांनी दिले.


 यावेळी मा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी पुढील मागण्या त्वरित मान्य केल्या.  
1)covid-19मुळे रद्द करण्यात आलेल्या परीक्षाचे शुल्क लवकरात लवकर विद्यार्थ्यांना परत करण्यात यावे.

2)संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा विचार करून महाराष्ट्र शासनाने  उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा काढण्या करिता चा कायदा करून महाविद्यालय स्तरांवर ते पाठविण्यात यावा जणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल.

3)विद्यापीठात आधी 5 शैक्षणिक विभाग होते. मागील वर्षी आणखीन सात शैक्षणिक विभाग सुरू करण्यात आले. परंतु वास्तविकतः सद्यस्थितीत असलेली इमारत हे सर्व वर्ग भरवण्यासाठी अपुरी आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने विद्यापीठास सर्व सोई युक्त अद्यावत शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देऊन हे शैक्षणिक संकुल कमीत कमी वेळेत उभे राहावे यासाठी लवकरात लवकर ठोस पावले उचलावीत.

4) सद्यस्थितीत विद्यापीठात एक मुलांचे व एक मुलींचे वसतीगृह आहे. विद्यापीठातील संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात अद्ययावत वसतिगृह तयार करण्यात यावे जेणेकरून विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल.

5) विद्यापीठात सद्यस्थितीत बारा पारंपारिक शिक्षण देणारे पदव्युत्तर विभाग आहेत. परंतु जल, जंगल, जमीन या विषयावर आधारित नवीन कोर्सेस विद्यापीठात सुरू करण्यात यावी जेणेकरून त्याचा फायदा या भागातील विद्यार्थ्यांना होईल.

6)विद्यार्थ्यांमधील उपजतगुण विकसित होण्याकरिता विद्यापीठाने विद्यापीठाचे सर्व सोयीयुक्त क्रीडा संकुल उभारावे ज्याचा फायदा या भागातील विद्यार्थ्यांच्या विकासात होईल. 

या 6 मागण्या त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन दिले त्याबद्दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिल्हा गडचिरोली च्या वतीने त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे , यावेळी गडचिरोली जिल्हा संघटनमंत्री शक्ती केराम, चामोर्शी नगर मंत्री अंकित चलाख, नगर सह मंत्री कार्तिक पाऊलबुध्दे , गडचिरोली नगर कार्यालय मंत्री स्वप्निल सातारे, अक्षय चलाख, प्रेम कोहळे, तुषार चुधरी व अभाविप चे कार्यकर्ते उपस्थित होते.