Click Here...👇👇👇

लोकसेवा मंडळाचे सदस्य तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव पारधे यांचे निधन.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- येथील लोकसेवा मंडळाचे सदस्य तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव नारायणराव पारधे यांचे आज दि.४ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.४५ वाजता त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.
      मृत्यूसमयी ते ९५ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,सून व नातवंडं असा आप्त परिवार आहे.येथील पिंडोनी स्मशानभूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यावेळी लोकमान्य विद्यालयाचे शिक्षक, भाजपा कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक उपस्थित होते. लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली.
      
            विठ्ठलराव पारधे रा.स्व.संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक होते. लोकसेवा मंडळाचे सहसचिव, श्रीराम जन्मोत्सव समिती व आषाढी एकादशी उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. वारकरी भजनाची त्यांना आवड होती.