चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई
चंद्रपूर:- VUENOW MARKETING SERVICES LIMITED या कंपनीचे संचालक यांनी इटरनेंट डिव्हाईस डाटा सेंटर मधील Cloud particle खरेदी व किरायाने देण्याचे करार करून गुंतवणूकदाराची आर्थिक फसवणूक केली असल्याने पोलीस स्टेशन रामनगर अप क्र. 777/2025 कलम 318(4), 316(2), 61(2), 3(5) भारतीय न्याय संहिता सन 2023 सहकलम 3 महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय संस्थांमधिल हितसंबंधांचे सरंक्षण) अधिनियम सन 1999 चा गुन्हा नोंद आहे.सदर गुन्हयाचा तपास मुम्मका सुदर्शन, पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपुर प्रमोद चौगुले, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर तथा प्रभारी अधिकारी आ.गु.शा. चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी संतोष शेगांवकर सहा. पोलीस निरीक्षक तपास पथक पोहवा सुरेश धाडसे, प्रभाकर तलांडे, उज्वल साखरकर, विजु झरकर आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपुर हे करीत असून नमुद कंपनीचा मुख्य संचालक सुखवेदंरसिंग हकमसिंग खरौर रा. मोहाली राज्य पंजाब यांना दिनांक 11/03/2026 रोजी अटक करण्यात आली असून नमुद आरोपीने VUENOW MARKETING SERVICES LIMITED या कंपनीत गुंतवणूकदाराचे पैसे स्विकारण्याकरीता वेगवेगळया 14 बँक खात्याचा वापर केली असून नमुद खात्यात एकुण 3717 करोड 30 लाख 82 हजार 947 रूपयाची आर्थिक उलाढाल झाल्याच्या दिसुन येत असून गुंतवणूकदाराची ठेवी परत करण्याकरीता महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय संस्थांमधिल हितसंबंधांचे सरंक्षण ) अधिनियम सन 1999 महाराष्ट्र शासन परीपत्रक क्रमांक एम पी आय/प्र.क्र. ०९/पोल-११ दिनांक २५/०२/२०१९ अन्वये कार्यवाही करीता कंपनीचे आय सी आय सी आय या बँकेंत असलेली २८ करोड ९९ लाख ११ हजार ३४९/रूपये गोठविण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. करीता VUENOW MARKETING SERVICES LIMITED या कंपनीचे इंटरनेट डिव्हाईस डाटा सेंटर मधील Cloud particle खरेदी व किरायाकरीता गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराच्या ठेवी परत मिळण्याकरीता आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथे वैध दस्ताऐवजासह ठेवी परत मिळण्याचा फार्म भरून देण्यात यावे.

