सुशी दाबगाव येथे विहिरीत आढळला वाघाचा बछडा.

Bhairav Diwase
0
वाघिणीचा बछडा सुखरूप.
Bhairav Diwase. April 21, 2021
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
मुल:- सुशी दाबगावं येथील एफडीसीएम वना लगत असलेल्या भाऊजी घोंगडे यांच्या शेतातील खाजगी विहिरीत पटेदार वाघाचा पिल्लू अंदाजे ५ ते ६ महिन्याचा पडलेला दिसला याची माहिती वनविभागास मिळताच वनविभागाची चमू घटना स्थळी पोहचली व काही तासाचे आत सदर बछळ्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले असून चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे.
व्हिडिओ न्युज पहा....
👇👇👇👇👇
सदर घटना सकाळी सात वाजता चे सुमाराची असून एफडीसीएम जंगला लगत मोठे मामा तलाव व भाऊजी घोंगडे यांचे मालकीचे शेत आहे. या शेतात भाजीपाल्याचे उत्पादन घेतल्या जात असल्याने शेती मालकांचे वास्तवही शेतातच आहे. नित्यानियमाप्रमाने शेती मालक शेतात काम करीत असताना त्यांना बंदरांच्या मोठं मोठ्याने किंचाळी मारीत असल्याचे लक्षात आले त्यावर त्यांनी वाघ येत असावा असा अंदाज बांधत सावध होताच पटेदार वाघाचा बछळा बंदराचा पाठलाग करताना दिसला बंदर उड्या मारीत शेतातील विहिरी लगत असलेल्या आंब्याच्या झाडावर झेप घेतला तोच वाघाच्या पिलानेही झडप मारली आणि थेट विहिरीत पडला.
चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील केळझर उपक्षेत्रातील दाबगावजवळील शेतामधील पाण्याने भरलेल्या विहरीमध्ये अंदाजे सहा-सात महिन्यांचा वाघाचा बछडा(छावां) पडल्याची माहिती वनविभागाला प्राप्त झाली. त्या माहिती आधारे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी जलद बचाव पथक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर हे सुध्दा घटना स्थळावर पोहचून पाहणी केली. वरीष्ठ वन अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी(वन्यजीव) TATR यांच्या मार्गदर्शनाखाली जलद बचाव गठ, यांनी कॅच पोल (Catch pole) च्या सहायाने वाघिणीचे पिल्लू सुखरूप विहिरीबाहेर काढून पिंजऱ्यात टाकले. त्यावेळी dfo जगताप मॅडम, एसीएफ लखमावाड , रेंजर वैभव राजूरकर, वणपाल, वनरक्षक, व वणमजूर तथा आर आर यू टीम, व आर आर टी ताडोबा चमू प्रामुख्याने उपस्थित होते. सदर वाघिणीच्या पिल्लाला पुढील उपचार करिता चंद्रपुरातील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर येथे नेण्यात आले. त्यावेळी पिलाला पाहण्या करिता मोठी गर्दी झाली होती. तर काही महिन्या अगोदर सुधा सुशी गावात वाघाचे पिलू सापडले होते. त्यामुळे गावात मोठी भीती निर्माण झाली आहे.
 सुशी दाब गावं जंगल परिसरात विविध प्राण्यांचे वास्तव असून सकाळचे सुमार हे वन्य प्राण्यांच्या भ्रमंती ची वेळ असल्याने व  वणाला लागून तलाव असल्याने वन्यप्राणी नेहमीच तलावाकडे पाणी पिण्यासाठी भ्रमंती करत असतात व  सद्या उन्हाळ्याचे दिवस सुद्धा सुरू झालेले आहे. 
त्यामुळे नागरिकांच्या व वन्य प्राण्यांच्या संघर्षाची मोठी चिंता निर्माण झालेली आहे. त्यामुळे वण विभागणी विशेष लक्ष देण्याची गरज नागरिकात बोलल्या जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)