🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

कोरोना संकटात जनतेच्या पाठीशी उभे रहा.

चंद्रपूर जिल्हा व लोकसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांना माजी खासदार अहिर यांचे आवाहन.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले असतांना जिल्ह्यातील अनेक कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झालेली दिसत आहे. मात्र या कोरोना रुग्णांसाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न त्रोटक पडत असल्यामुळे अनेकांना औषधोपचार व आरोग्य सेवेला मुकावे लागत आहे असे सांगतांना जिह्यातील हि दयनीय स्थिती सुधारण्यासाठी जिल्ह्यातील सर्व भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नागरसेक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व कार्यकर्त्यांनी या कठीण काळात कोरोना रुग्णांची व त्यांच्या परिवारास सहकार्य करण्याचे आवाहन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले आहे. 
      चंद्रपूर जिल्ह्यात व चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचे विस्तृत जाळे विणले असल्याने महानगरातील प्रत्येक प्रभाग व ग्रामीण भागातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या कोरोना काळात संपर्पण वृत्तीने समोर येत नागरिकांमधील भीतीचे वातावरण संपुष्टात आणत नवीन उमेद उभारावी असेही यावेळी अहीर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करतांना सांगितले आहे. 
      परिसरातील कोरोना रुग्णांच्या तसेच त्यांच्या परिवारातील कुठल्याही सदस्यांच्या आरोग्य सेवेत तथा औषोधोपचारात तसेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात कुठलीही अडचण येत असल्यास महापौर, न. प . अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रा. पं. सदस्य, भाजप जिल्हा महानगर कार्यकारिणी सदस्य, नगरसेवक, महानगर मंडळ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख यांनी आपले कर्तव्य समजून या कोरोना संकट काळात प्रत्येक नागरिकांची काळजी घ्यायची आहे. कुठल्याही रुग्णांना  बेड, तपासणी, आरोग्य सेवा, औषधोपचार मिळण्यास अडचण झाल्यास त्वरित जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी अहीर यांनी केले आहे. 
     चंद्रपूर जिह्यात व चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात कोरोनाचे संकट वाढत असतांना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर कोरोना रुग्ण सेवेत तसेच त्यांच्या आरोग्य सुविधांकरिता तळमळीने कार्य करतांना दिसत असतांना त्यांचे या भाजप लोकप्रतिनिधी, पदाधीकारी कार्यकर्त्यांना केलेले आवाहन कोरोना रुग्ण व त्यांच्या परिवाराच्या सेवेकरिता नक्कीच उपयुक्त ठरेल असा विश्वास जनमानसात व्यक्त केल्या जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत