🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी दिले पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन.(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर : सध्या चंद्रपुर जिल्ह्यामध्ये कोविड-19 चे दररोज १२०० ते १५०० चे रुग्ण आढळून येत असून रुग्णांचे नातेवाईक रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळविण्याकरिता तसेच रेमडीसीवर इंजेक्शन मिळवण्याकरिता धावपळ करीत आहे. परंतु जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन बेड व रेमडीसीवर इंजेक्शन चा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. बरचसे अतिबाधित कोविड-19 च्या रुग्णांना उपचारासाठी त्यांचे नातेवाईक बाहेरच्या जिल्ह्यामध्ये तसेकंग आंध्र प्रदेश नेत आहेत. ऑक्सिजन अभावी तसेच रेमडीसीवर इंजेक्शन अभावी रुग्ण दगावत आहे.
   त्यामुळे तालुक्यातील सी.सी.सी. हॉस्पिटल चे रूपांतरण डी. सी.एच.सी. हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडची सुविधा करण्याची मागणी केली आहे. 
    तसेच हँड सॅनिटायजर, सर्जिकल मास्क, एन-95 मास्क, सोडियम हायफो क्लोराईड, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर, जनजागृती करिता पोम्प्लेट व बॅनर इत्यादी साहित्याची मागणी पत्राच निवेदन आज जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. विजय वडेट्टीवार यांना दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत