🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू.

Bhairav Diwase. April 21, 2021
नाशिक:- नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात टँकरमधून आॉक्सिजन टँकमध्ये भरताना गळती झाली होती. या दुर्घटनेत जवळपास 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही दुर्घटना घडली. त्यावेळी जवळपास 150 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. तर, जवळपास 30 ते 35 जण मृत्यूच्या दाढेत असल्याचा दावा केला जातोय. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना काय?
नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12.30 च्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमध्ये टँकरमधून ऑक्सिजन भरायचे काम सुरु होते. ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनानं धावपळ केली. मात्र, यावेळी रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांना याचा त्रास झाला आणि यामध्ये 22 जणांना जीव गमावावा लागला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत