Top News

गंभीर रुग्णांच्या ऑक्सीजन साठी धावाधाव, रेफर टू चंद्रपुर...

उपजिल्हा रुग्णालयात एकही व्हेंटिलेटर नाही.

आरोग्य व्यवस्था कोलमडली.

माजी आमदार सुदर्शन निमकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यात कोरोणा रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. वैद्यकिय सेवाही अपु - या पडत आहे. उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी एकही वेंटिलेटर बेडची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे ऑक्सिजन लेव्हल कमी झालेले रुग्णांना जीव वाचवण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. काही रुग्ण उपचारासाठी परराज्यात जात आहेत. कोरोना रुग्णांचे मृतदेह उचलण्यासाठी कर्मचारी नाहीत. कोविड केंद्राच्या सभोवताल घाणीचे साम्राज्य आहे. अशा स्थितीत नागरिकांना सुविधा मिळण्यासाठी परिसरातील उद्योगांना कोवीड सेंटर उभे करण्याचे निर्देश देण्यात यावे व नागरिकांना संकट काळात मदत करावी अशी विनंती माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा , कोरपना , जिवती सह गोंडपिपरी तालुक्यात कोरोणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. अपुऱ्या वैद्यकीय सोयी सुविधांमुळे आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे . कोवीड केंद्रावर अनेक ठिकाणी समस्या उद्भवल्या आहेत. त्यात राजुरा उपजिल्हा रूग्णालयात २५ मे रोजी ४ कोरोणाबाधीत रूग्णांचा मृत्यू झाला . त्यांचे मृतदेह उचलून शववाहीकेत टाकण्याकरीता कोणीही समोर येत नसल्याचे भयावह चित्र समोर आले आहे . नगर परिषदेचे कर्मचारी रूग्णालय प्रशासनाची जबाबदारी आहे असे म्हणून मृतदेह टाकण्यास स्पष्टपणे नकार देत होते . या दिरंगाईमुळे तब्बल २४ तासांनी म्हणजे दुसऱ्या दिवशी रूग्णालयातील सुरक्षा रक्षक , एक नर्स आणि एका व्यक्तीने उचलून हे मृतदेह शववाहीकेत टाकूण अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले .
ही बाब अत्यंत गंभीर असून मृतांची विटंबणा केल्या गेल्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना दुःखात मानसिक त्रास सहन करावा लागला. मृत्यूनंतरही प्रचंड वेदना सहन करावा लागत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन सुविधा पुरविण्याची मागणी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे.
Covid-19 खेड्यापाड्यात ही वेगाने पसरल्यामुळे रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. तालुका पातळीवर कोवीड केंद्र रुग्णांनी पूर्णपणे भरलेले आहे. उपजिल्हा रुग्णालयात 23 बेड ऑक्सीजन युक्त आहेत. या सेंटरवर 90 पर्यंत ऑक्सीजनची पातळी असणाऱ्या रुग्णांना उपचार केल्या जाते . 90 च्या खाली आलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी तात्काळ चंद्रपूर येथे रेफर करावे लागते अशी माहिती येथील डॉक्टरांनी दिली.मात्र सद्यस्थितीमध्ये चंद्रपूर येथे कोवीड रुग्णालयात बेड जागा उपलब्ध होत नसल्यामुळे ऑक्सिजनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरु आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात एकही व्हेंटिलेटर उपलब्ध नाही त्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. स्वच्छतेसाठी कर्मचारी नाहीत. त्यामुळे कोविड केंद्रावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कोवीड केंद्रावरील स्वच्छतेच्या बाबतीत तक्रारी वाढलेल्या आहेत. स्वच्छता कर्मचारी पुरवण्याबाबत नगरपरिषद प्रशासनाला आरोग्य विभागाने पत्र दिले आहे. मात्र अजूनही व्यवस्था झालेली नाही. कोवीड सेंटरच्या बाहेर कचरा व शिळे अन्न इतरत्र फेकल्या जात आहे . परिसरातील माकडे कोरोणाग्रस्तांचे उरलेले अन्न खात आहेत आणि माकडांचा स्वैर संचार शहरात होत आहे.

संकट काळात नागरिकांना आधार देण्यासाठी साठी जिल्हा प्रशासनाने स्थानिक भागातील उद्योगांना निर्देश द्यावे. उद्योगाचा ताब्यात असलेल्या डीस्पेंसरीज व डॉक्टर यांच्या सेवा कोविड केंद्र निर्माण करून देण्यात यावे. जेणेकरून गंभीर रुग्णांना तात्काळ उपचार मिळेल.गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळन्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर ची व्यवस्था करण्यात यावी. कोरोनाबधित मृतदेहाची विटंबना टाळावी यासाठी योग्य व्यवस्था करण्यात यावी.
श्री. सुदर्शन निमकर
माजी आमदार, राजुरा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने