🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

विद्युत तारेच्या स्पर्शाने शेतकऱ्याचा मृत्यू. #Shock #Current #Electricstars #death


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी तालुक्यातील एकारा येथील शेतकरी हरी मूरखे वय 57 धान पिकाला खत टाकण्यासाठी स्वतःच्या शेतावर गेले असता पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन त्यांचा शेतातच मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी 7 च्या दरम्यान घडली. #Shock #Current #Electricstars #death
दोन दिवसांपासून ब्रह्मपुरी तालुक्‍यात वादळी वारा मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली आहे अशातच वादळी पावसामुळे कृषी पंपांना विज पुरवठा करणारे विजेचे खांब एकारा परिसरात कोसळले आहेत. कोसळलेल्या विजेच्या खांबावरील विद्युत तारातून
वीज प्रवाह सुरूच असल्याची बाब एकारा येथील शेतकरी हरी मुरखे यांच्या लक्षात न आल्याने शेतावर खत टाकायला गेले असता जिवंत तारेच्या स्पर्शाने हरी मुरके या अपंग शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला . चार पाच दिवसांपूर्वीचा शेत शिवारात दोन विजेचे खांब कोसळले होते , मात्र महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यानी या विद्युत खांबाच्या तारातून होणारा वीज प्रवाह वीज खंडित केला नव्हता . महावितरणच्या हलगर्जीपणा मुळे शेतकरी हरी गोविंदा मुरखे यांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत