वृद्ध शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा. #Chandrapur

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- वारंवार प्रशासनाकडे दाद मागुनही न्याय न मिळाल्यामुळे त्रस्त झालेल्या ८२ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने अखेर प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा पत्रपरिषदेतून दिला आहे.महादेव गणपती वरारकर रा.घोनाड त.भद्रावती असे आत्मदहनाचा इशारा देणा-या वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे.
त्यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, मौजा घोनाड येथे भूमाक्र.१३१ मध्ये आमची ७.९० हे.आर. शेतजमीन आहे. ही शेतजमीन माझ्या पुतण्याने मला अंधारात ठेवून सुखदेव डाकोजी खोब्रागडे रा.बेलेवाडी तुकूम चंद्रपूर यांना विकली. याबाबतचा वाद न्यायालयात गेला आहे. न्यायालय जो निर्णय देईल, तो मला मान्य राहील. परंतू तोपर्यंत मला माझ्या हिश्याची शेतजमीन वाहू द्यावी अशी मागणी त्यांनी पत्रपरिषदेत केली. याबाबत संबंधित अधिकारी यांच्याकडे तक्रार करून दाद मागितली असता आपल्याला न्याय मिळाला नाही. माझे वडील स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते. मी संपूर्ण आयुष्यात कधीही भ्रष्टाचार केला नाही. उलट चांगल्या कामासाठी लोकांना मदतच केली. मग माझ्यावर असा प्रसंग का? असा प्रश्न उपस्थित करत १० दिवसांच्या आत मला न्याय न मिळाल्यास मी भद्रावतीच्या तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करीन असा इशाराही महादेव वरारकर यांनी पत्रपरिषदेत दिला. तसेच तहसीलदारांनी आपल्याला शेती ला कुंपण करायला सांगितले.त्याकरीता आपण ७ हजारांचे साहित्य घेतले. ते संपूर्ण गायब झाले आहे. याबाबत पोलिसांना सांगितले असता पोलिसांनी आपणास हाकलून लावले. असा आरोपही वरारकर यांनी पत्रपरिषदेत केला.