व्हाट्सअप चा वापर सर्वच लोक करतात. परंतु या अॅपचा वापर करून सध्या मोठ्या प्रमाणात युजर्सची फसवणूक होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. सध्या व्हाट्सअप वर वैक्सीन संदर्भात लिंक आली असेल तर काळजी बाळगा. कारण हा बनावट मेसेज असून यामुळे तुम्ही मोठ्या फसवणुकीला बळी पडू शकता.
काय आहे फेक मेसेज?*एक आवश्यक सूचना* -जिन्होंने वैक्सीन लगा लिया उन्हें5000 रु प्रधानमंत्री जन कल्याणविभाग द्वारा दिया जा रहा है, आपने भी कोरोना का वैक्सीन लगा लिया है तो अभी फॉर्म भरें और 5000 रू प्राप्त करेंइस लिंक से फॉर्म भरेंhttps://pm-yojna.in/5000rsकृपया ध्यान दें - 5000 रु की राशिसिर्फ 30 जुलाई 2022 तक ही मिलेगा!
वरील व्हायरल होत असलेला मेसेज हा बनावट असल्याचे समोर आले आहे. वरील व्हायरल संदेश मध्ये तारीख बदलून पुन्हा दुसऱ्या महिन्यात शेअर केला जात आहे. कृपया अशा संदेशांच्या लिंक उघडू नयेत. त्यामुळे फोन हॅक होण्याचा किंवा प्रसंगी आर्थिक नुकसान होण्याची देखील शक्यता आहे. असे संदेश आपल्याला आल्यास उघडून न पाहत थेट delete करावेत. दक्ष राहावे, नुकसान टाळावे. व अन्य व्यक्तींना किंवा व्हाट्सअप ग्रुप मध्ये शेअर करु नये.