Election News: अखेर बिगुल वाजले ! महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर

Bhairav Diwase

पहिल्या टप्प्यात नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका होणार


मुंबई:- महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद आज ( दि. ४ ) रोजी पार पडली. यावेळी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यातील बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली.

गेली काही वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या. परंतु आता खऱ्या अर्थाने निवडणूका मार्गी लागल्या असून आयोगाने नगरपरिषदा व नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात नगरपरिषद, नगरपंचायत यांच्या निवडणुका होतील. राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायती करिता ही निवडणूक होणार आहे.


अर्ज दाखल करण्याची तारीख १० नोव्हेंबर आहे. तर अंतिम तारीख १७ नोव्हेंबर आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर आहे. मतदान २ डिसेंबर रोजी होईल, तर मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होऊन निकालही त्याच दिवशी जाहीर होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.