Local Body Election : मोठी बातमी! आयोगाची आज पत्रकार परिषद; निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता?

Bhairav Diwase
मुंबई:- राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होणार आहे. आगामी निवडणुकीच्या संदर्भात ही पत्रकार परिषद असल्याची माहिती समोर आली आहे. आज राज्यातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


३१ जानेवारी २०२६ पर्यंत राज्यातील सर्व निवडणुका घेण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. त्यानुसार, आयोगाकडून तयारी करण्यात येत आहे. राज्यातील निवडणुका तीन टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. राज्य आयोगाची आज दुपारी चार वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे.


अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. आज दुपारी ४ वाजता राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये राज्यातील निवडणुकीची घोषणा अथवा निवडणुकीच्या तयारीचा आढवा सांगितला जाऊ शकते. नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. निवडणुकीची घोषणा होताच त्यावेळेपासून राज्यात आचारसंहिता लागू होणार आहे.