कोरपना :- गडचांदूर. दिनांक 21 सप्टेंबर 2022 प्रेरणा महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय शांतता दिनाचे औचित्य साधून 21 व्या शतकात सर्व देशामध्ये कशाप्रकारे शांततेच्या माध्यमातून बंधुभाव वाढीस लागेल व सर्वत्र शांतता कशी नांदेल याविषयी प्रा.ऐजाज शेख यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आपल्या वक्तव्यातून 'अहिंसा परमो धर्म' असून भारत भूमी ही संतांची व जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या बुद्धाची असून आज भारत देश त्याच मार्गाने आपली वाटचाल करत आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून प्राचार्य नानेश्वर धोटे सर यांनी आज संपूर्ण देशाला बुद्ध व गांधीच्या विचाराची गरज असल्याचे नमूद केले.
सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा.एम वाय मडावी,प्रा.पंकज देरकर प्रा.मनीषा मरसकोल्हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.महेश मडावी तर संचालन सरस्वती मडावी,आभार सुरज तोडसे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेणू मॅडम, भैसेकर सर, सुरज तलांडे व विद्यार्थ्याने सहकार्य केले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत