ग्रा. पं. उमेदवारांना उद्या सुद्धा जातपडताळणी प्रमाणपत्राची पोचपावती मिळवता येणार! #Chandrapur

Bhairav Diwase
0

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या विनंतीवरून विभागीय समिती अध्यक्षांच्या कार्यालयांना सुचना
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील ९४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून उमेदवारांकडून नामनिर्देशनासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.
अशात उद्या (२४) तारखेला सरकारी सुट्टी असल्याने जातपडताळणी कार्यालये बंद राहिल्यास उमेदवारांना याचा फटका बसणार होता.
याची वेळीच दखल घेऊन जिवती पं. स. चे माजी उपसभापती महेश देवकते यांनी यासंदर्भात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांना माहिती दिली. सदरहू प्रकार कळताचं जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी जातपडताळणी समितीचे नागपूर विभागीय अध्यक्ष मा. कलंत्रे साहेब यांना भ्रमणध्वनी करून दि. २४ सप्टेंबर रोजी शनिवार आल्याने या दिवशी जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालय बंद राहिल्यास ग्रा. पं. उमेदवारांना जातपडताळणी प्रमाणपत्र (Validity Certificate) उपलब्ध होणार नाही. त्यामुळे उमेदवारांचे नुकसान होऊ शकते. त्यासाठी उद्या दि. २४ सप्टेंबर रोजी जातपडताळणी कार्यालये सुरू ठेवण्यात यावी, अशी विनंती केली. त्यांच्या विनंतीनुसार समितीचे विभागीय अध्यक्ष मा. कलंत्रे साहेब यांनी उद्या जातपडताळणी कार्यालये सुरू राहतील असे सांगितले.
जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वेळीच लक्ष घालून प्रशासनाला विनंती केल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या उमेदवारांना याचा फायदा होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)