Top News

शब्दांकूर फौंडेशन, चंद्रपूर द्वारा पुरस्कार जाहीर.... #Chandrapur


पंचायत समिती गोंडपीपरी सभागृहात मान्यवरांच्या हस्ते वितरण
चंद्रपूर:- शब्दांकूर फौंडेशन, चंद्रपूर ही एक नोंदणीकृत सामाजिक संस्था असून ती शैक्षणिक, सामाजिक, साहित्य व क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी कार्य करते.शब्दांकुर फाउंडेशनतर्फे "ध्यास एक परिवर्तनाचा" हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन कार्य करीत असते.शब्दांकुर फाऊंडेशनचे मार्गदर्शक श्रीकृष्ण अर्जुनकर,मुख्य कार्यकारी अधिकारी,गृहलक्ष्मी महिला पतसंस्था,गडचिरोली यांच्या सौजन्याने सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
गोंडपीपरी हा दुर्गम भागातील तालुका असून यात एकूण आठ केंद्र आहेत.या वर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी भरीव योगदान देणाऱ्या गोंडपीपरी तालुक्यातील ०८ शिक्षकांचा सन्मान करण्यात येत आहे.शब्दांकूर फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने "शब्दांकूर उत्कृष्ठ शिक्षक सन्मान-२०२२" देऊन गौरविण्यात येणार आहे तसेच भंगाराम तळोधी केंद्रातील नंदवर्धन या शाळेतील शिक्षकांनी एकमेकांच्या सहकार्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन नावलौकिक केल्याबद्दल त्या शाळेला देखील "शब्दांकूर उत्कृष्ठ शाळा सन्मान २०२२" यानावाने गौरविण्यात येणार आहे.
 शब्दांकूर फौंडेशनच्या वतीने दिला जाणारा शब्दांकूर उत्कृष्ठ शिक्षक सन्मान-२०२२ केंद्र करंजी मधून अर्चना प्रमोद जिडकुंटावार,गोंडपीपरी केंद्रातून झुंगा बिजा कोरडे,वढोली केंद्रातून बंडू सखाराम फोफरे,तोहोगाव केंद्रातून टिकेश्वर तुकाराम चुदरी,धाबा केंद्रातून नितीन पत्रूजी चापले,वेडगाव केंद्रातून अमोल रावजी नैताम,विठ्ठलवाडा केंद्रातून नंदिनी परशुराम पिंपळकर तर भंगाराम तळोधी केंद्रातून बंडू अशोक गंधेवार यांची निवड करण्यात आली आहे.२४ सप्टेंबर २०२२ रोजी पंचायत समिती गोंडपीपरी सभागृहात मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह,प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ देऊन पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.तरी पुरस्कार वितरण सोहळ्याकरिता उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे पदाधिकारी दुशांत निमकर,राजेश्वर अम्मावार,किशोर चलाख,राकेश शेंडे,प्रशांत खुसपुरे,उषा निमकर,आशिष ढवस इत्यादी करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने