Click Here...👇👇👇

संकरपुर येथे विविध प्रशिक्षणांचा शुभारंभ #chandrapur #chimur

Bhairav Diwase

बी-एक्स्ट्रा संस्थेचा स्तुत्य उपक्रम
चिमूर:- संकरपुर चिमूर (ता.21) पुरूष-महिला आणि मुलांना आधुनिक काळाच्या गरजनुसार शिक्षण देऊन आर्थिक तसेच सामाजिक परिस्थिती मध्ये बदल घडून आत्मनिर्भर व्हावे यासाठी बी-एक्स्ट्रा संस्थेद्वारे संकरपुर तहसील चिमूर येथे विविध विषयांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात सोमवार (ता.20) करण्यात आली.
सदर प्रशिक्षणाचा शुभारंभ येथील जिल्हा परिषद शाळा चे मुख्याध्यापक श्री वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आली असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कार्यकारी संचालक हसनकुमार कोटांगले , संस्थेचे संचालक सुधीर निकुरे संस्थेचे नागभिड ब्लॉक चे विकास अधिकारी दशरथ चौधरी, तालुका विकासाधिकारी सौ. छाया निकूरे प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर संस्थेद्वारे शिवणकला, कॅम्पुटर, ब्युटी पार्लर, स्पोकन इंग्लिश, इत्यादी विषयांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून. सदर प्रशिक्षणाचा लाभ गरजू विद्यार्थ्यांनी घेवून आपले भविष्य उज्वल करावे असे आव्हान यावेळी संस्थेद्वारे करण्यात आले. कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थी मुले मुली, चिमूर - नागभिड चे प्रभाग व्यवस्थापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन रंजू सवाईवार यांनी तर आभार आशिष चौधरी यांनी मानिले.