Top News

११ वर्षीय मुलीचा कालव्यात पडून मृत्यू #chandrapur #bramhapuri #Death

 

Death, chandrapur, bramhapuri

ब्रम्हपुरी:- आजी सोबत शेतावर गेल्यानंतर शौचासाठी गेलेल्या मुलीचा गोसीखुर्द कालव्यात तोल गेल्याने पाण्यात पडुन मृत्यू (death) झाल्याची घटना दि. २० नोव्हेंबरला सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. मृतक मुलीचे नाव अमृता संदिप मरस्कोल्हे वय 11 वर्षे रा. रानबोथली असे आहे.

ब्रम्हपुरी (Bramhapuri) तालुक्यातील रानबोथली येथील अमृता ही आपल्या आजी सोबत शेतावर गेली असता तिला शौचास लागल्याने ती बाहेर गेली व ती शौच धुण्याकरीता जवळ असलेल्या गोसीखुर्द (Gosikhurd) कालव्याजवळ गेली. कालव्यातील पायऱ्या उतरत असताना तिचा तोल गेल्यामुळे ती पाण्यात पडली. सदर घटनेची माहिती मिळतात गावातील लोकांनी कालव्याकडे धाव घेऊन नहरातील पाण्यात शोध घेतला असता अमृता मृत (death) अवस्थेत आढळून आली. अमृताच्या जाण्याने मरस्कोल्हे कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सदर घटनास्थळाचा पंचनामा ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनचे उपपोलिस निरीक्षक सुरेंद्र उपरे, पोलीस हवालदार धनरे, पो. ह. दुपारे यांनी करून शव ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येते उत्तरिय तपासणी साठी पाठविण्यात आले. सदर घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने