Top News

गोंडवाना विद्यापीठात अभाविप चे विविध मागणींना घेऊन घंटा नाद आंदोलन #chandrapur #gadchiroli


विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थीहित लक्षात घेता सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात:- शक्ती केराम. अभाविप विदर्भ प्रदेश मंत्री

1)विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचे मूल्यमापन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा प्रमाणे त्रिस्तरीय परीक्षक ,समिक्षक व मुख्य समिक्षक नमुना आदर्श उत्तरपत्रिका तयार करून मूल्यमापन करावे.

2)चालू नवीन शैक्षणिक वर्षात विद्यापीठाच्या सर्व स्तरावरील क्रीडा स्पर्धेत विद्यार्थीनी करिता महिला व्यवस्थापक व प्रशिक्षक पाठविण्यात यावे.


3)आजादी का अमृत महोत्सव आपण साजरा करतोय गोंडवाना विद्यापीठ हे जनजाती जिल्ह्यातील विद्यापीठ आहे त्यामुळे विद्यापीठातिल वसतिगृह व सभागृहाला महापुरुषाची नावे देण्यात यावी.

4)मॉडेल कॉलेज च्या नविन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची माहिती होण्याच्या दृष्टीने विद्यापीठ कार्यक्षेत्रातील दोन्ही जिल्ह्यात सर्व वृत्तपत्रात,होर्डिंग, पत्रके या माध्यमातून जाहिरात करण्यात यावी.


5)विद्यार्थी विकास योजनांची माहिती विद्यापीठ संलग्नित सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना देणे,त्याची माहिती सुचना फलकांवर लावणे, महाविद्यालयात कडून प्रस्ताव सादर करणे बंधनकारक करण्यात यावे. याची अमंलबजावणी न करणाऱ्या प्राचार्य व महाविद्यालयावर दंडात्मक कार्यवाही करावी.

6)विद्यापीठाच्या विविध विभांगाची माहिती देण्याकरिता विद्यार्थी सुविधा केंद्राची निर्मिती करण्यात यावी.

7)क्रांतिवीर बाबुराव शेडमाके कमवा व शिका योजना आता पर्यत किती विद्यार्थ्यांना देण्यात आली वं नाही दिली त्याचे न देण्याचे कारण काय हे सांगावे.

8)विद्यापीठाच्या incubation सेंटर ला जो निधी बहाल करण्यात आला तो निधी विद्यापीठाणे कुठे खर्च केला वं incubation सेंटर ला चा लाभ किती विद्यार्थ्यांना झाला किती नवीन उद्योजकाना चालना देण्याकरिता आपण प्रयत्न केले याची माहिती लिखित आपण आम्हला द्यावी.

9)विद्यापीठाणे परीक्षा शुल्क किमान पाच वर्ष कायम ठेवावे त्यात प्रत्येक शैक्षणिक सत्रात शैक्षणिक शुल्कात वाढ करण्यात येऊ नये.

10)रिचेकिंग मध्ये जे विद्यार्थी पास झालेत अश्या सर्व विद्यार्थ्यांना त्याचे परीक्षा शुल्क परत देण्यात यावे.

11)ज्या विषयात विद्यार्थी हा नापास झालाय त्याच विषयांचे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांन कडून घेण्यात यावे पूर्ण विषयाचे शुल्क विद्यार्थ्यांकडून घेत असल्यामुळे विद्यार्थ्यां ची आर्थिक पिळवणूक होत आहे विद्यापीठाने हि विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.

12)विद्यापीठाचे परिपत्रक व नोटिफिकेशन विद्यार्थ्यांच्या व्हॉट्स ॲप नंबर वर पाठविण्यात यावे.

13)विद्यापीठाच्या प्रवेश द्वारावर वेगवेगळ्या विभागाची माहितीचा नकाषा लावण्यात यावा.

14)विद्यापीठातिल वसतिगृहात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अग्निवीर मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात यावे.

15)विद्यापीठ परिसरात भगवान बिरसा मुंडा व स्वामी विवेकानंद यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा.

16)विद्यापीठाने विद्यार्थी विकास विभागाकडून कोणकोणत्या व किती प्रकारच्या योजना राबवल्या जातात याचे फलक विद्यापीठाच्या दर्शनीय भागावर लावावे जनेकरून विद्यार्थ्यांना त्या योजनाची माहिती होईल व विद्यार्थी त्या योजनाचा लाभ घेऊ शकतील.

17)विद्यापीठाने नेमून दिलेले phd मार्गदर्शन केंद्र (CHLR ) याची फि खुप जास्त प्रमाणात आकारल्या जात आहे जेव्हा कि संशोधन केंद्र असलेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा दिल्या जात नाहीं त्यामुळे (CHLR )सेंटर ची फी ही कमी करण्यात यावी.

18)संशोधन करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना विद्यापीठाडून अधीछात्र वृत्ती बहाल करण्याची घोषणा ही मागील सत्रात करण्यात आली परंतु त्याची अंमल बजावणी अजून केली गेली नाहीं याचे कारण आम्हला सांगावे व लवकरात लवकर संशोधक विद्यार्थ्यांना अधीछात्र वृत्ती ही बहाल करण्यात यावी.

19)विद्यार्थ्यांना अपघात विमा म्हणून एक लाखा पर्यत ची रक्कम देण्यात यावी.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने