जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनाने तिसऱ्या दिवशी आदिवासी बांधवांचा ठिय्या आंदोलन मागे #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase


पोंभूर्णा:- जल,जंगल,जमीन हमारी है चा नारा देत तालुक्यातील ग्रामपंचायतींना पेसा कायद्याचे हक्क द्यावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्या घेऊन आदिवासी बांधवांचा पोंभूर्णा शहरातील बस स्टॉप चौकातील मुख्य मार्ग अडवून मंगळवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.हा ठिय्या आंदोलन सलग तीन दिवसापासून सुरू होते. आंदोलक कोणत्याही परिस्थितीत मागण्या मान्य झाल्या शिवाय उठणार नसल्याचा सजड दम दिला होता.

प्रशासनाने तीनदा आंदोलनकर्त्यांसोबत मागण्यांच्या संदर्भात चर्चा घडवून आणली मात्र आंदोलनकर्त्यांने तो प्रस्ताव फेटाळून लावत जो पर्यंत जिल्हाधिकारी स्वतः येऊन आमच्या मागण्या मान्य झाले असल्याचे लेखीपत्र देत नाही तोपर्यंत आम्ही हा आंदोलन असंच सुरू ठेऊ असा गर्भित इशारा यावेळी आदिवासी नेते जगन येलके यांनी प्रशासनाला दिला होता.

मंगळवारपासून ठिय्या असल्याने आंदोलक ऊन पाऊस सहन करत आंदोलनस्थळी ठिय्या आंदोलन करीत होते.बुधवारच्या रात्री वादळ वारा व धो-धो पाऊस सुरू असतांना सुद्धा आंदोलक जागेवरून उठले नाही.वादळामुळे चौकात टाकलेले मंडप सुद्धा उडून गेले होते.इतक्या कठीण परिस्थितीशी झगडून आंदोलन सुरू असल्याने आंदोलन किती दिवस चालणार हे कळायला मार्ग नाही.प्रशासन यावर तोडगा काढतांना दिसत असले तरी ते हतबल झाले असल्याचे एकंदरीत चित्र पाहायला मिळत होते. मात्र प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी तीसऱ्या दिवशी रात्रो आंदोलन मागे घेतला.

५० टक्के आदिवासी बहुल असलेल्या गावांमध्ये पेसा कायदा लागू करावा, ५० वर्षांपासून कसत असलेल्या वनजमिनी आदिवासींना देण्यात याव्या, सुरजागड येथील अवजड वाहतूक बंद करावी,तीन गावातील इको सेन्सिटिव्ह झोन रद्द करण्यात यावे, वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसानीचा मोबदला वाढविण्यात यावा,देवई येथे ऐतिहासिक वारसा म्हणून घोषित करण्यात यावे अशा अनेक मागण्या घेऊन आदिवासींचे हे आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर आदिवासी तीसऱ्या दिवशीही ठाम आहेत.या आंदोलनामुळे तीन दिवसापासून वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती.त्यामुळे पोंभूर्णावासीयांनाही याची झड बसत होती मात्र प्रशासन यावर कोणताही तोडगा काढण्यासाठी असमर्थ असल्याने प्रशासनाच्या विरोधात सामान्य माणसांकडूनही प्रतिक्रिया उमटायला लागल्या होत्या.

बुधवारची रात्र आंदोलनकर्त्यांसाठी कठीण होती.भयंकर वादळ वारा व पावसामुळे बांधण्यात आलेला मंडप उडून गेला.व रात्रभर लाईटची व्यवस्था नसल्याने मोठी पंचाईत झाली होती मात्र उपस्थित तीन हजार आंदोलकांनी भर पावसातही आपला ठिय्या सोडला नाही.या पावसात महिला व चिमुकले लेकरंही भिजत होते.
प्रशासन व आंदोलकांच्या बैठका तिसऱ्या दिवशीही फिसकटत असल्याने आंदोलनकर्त्ये आता वेगळी भुमिका घेणार असल्याचे सांगत असल्याने आंदोलन कोणता वळण घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.जगन येलके यांनी आंदोलन अनिश्चीत काळासाठी असल्याचे त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले होते मात्र प्रशासनाच्या वतीने तीसऱ्या दिवशी बुधवारला रात्री ७.३० वाजताच्या दरम्यान पुन्हा एकदा आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात जिल्हाधिकारी गौडा यांच्या स्वाक्षरीने लेखीपत्र देण्यात आले.यातील बहोतेक मागण्या मान्य झाले असल्याने रात्री ७:३० वाजता आदिवासी बांधवांनी आंदोलन मागे घेतले.

यावेळी आदिवासी नेते जगन येलके व देवाडा खुर्दचे सरपंच विलास मोगकार, उपविभागीय अधिकारी संजयकुमार ढव्हळे, तहसिलदार शुभांगी कनवाडे,उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक धर्मेंद्र जोशी, ठाणेदार मनोज गदादे आदि पोलिस अधिकारी, महसूल अधिकारी उपस्थित होते.