सरदार पटेल महाविद्यालयात अज्ञात चोरट्यांनी बॅग आणि मोबाईल केला लंपास
Google ads.
चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सुरू झाल्या आहेत. चंद्रपूर शहरातील सरदार पटेल महाविद्यालय येथे परीक्षा केंद्र असल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला येत असतात.परीक्षेच्या वेळी मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू आत नेता येत नाही पण काही विद्यार्थी आपल्या जवळ असलेल्या बॅगमध्ये मोबाईल ठेवून ती बॅग परीक्षा हॉलच्या बाहेर ठेवण्यात येते.
दि.११ मे ला २:३० वाजताच्या सुमारास दुपारच्या सत्रात परीक्षा सुरु असताना अज्ञात चोरट्यांनी सरदार पटेल महाविद्यालयात प्रवेश करून परिक्षा हॉलच्या बाहेर ठेवण्यात आलेली बॅग व मोबाईल लंपास केली. अज्ञात चोरट्यांनी पहिल्या माळ्यावरून सावन पेरसिंगवार BCA 2nd year (सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर) या व्यक्तीची बॅग चोरून नेली तसेच दुसऱ्या माळ्यावरून रोहित घोडाम B.Com सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर या विद्यार्थ्यांचा Redmi 8A हा मोबाईल लंपास केला. ही चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे महाविद्यालय खळबळ माजली आहे.चोरी करणारा एकटा नसून त्याचे साथीदार चोरही सोबत असल्याचे दिसून येत आहेत.याबाबत महाविद्यालय प्रशासन काय भुमिका घेणार आहे याकडे लक्ष लागले आहे.
संतोष रावत यांच्यावर गोळीबार
या घटनेच्या संबंधित आधार न्युज नेटवर्कनी महाविद्यालयातील प्राचार्यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले की,सदर घटनेची माहिती मिळाली असून विद्यार्थ्यांची बॅग आणि मोबाईल चोरीला गेले आहे. त्यांना उद्याला महाविद्यालयात बोलवण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अज्ञात व्यक्ती तोंडाला मास्क बांधून महाविद्यालयात प्रवेश केला व त्यांनी बॅग व मोबाईल घेऊन पसार झाला असल्याचे निदर्शनास येत आहे. या घटनेची सत्यता पडताळणीसाठी उद्याला पुन्हा सीसीटीव्ही बघून पुढील कारवाईसाठी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात येईल.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत