Top News

चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ #chandrapur #Mul #firing


संतोष रावत यांच्यावर गोळीबार


Google ads.
मुल:- मुल येथील काँग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर आज अज्ञात इसमानी गोळी झाडली. या घटनेत संतोष रावत यांना कोणतीही इजा झाली नसली तरी त्यांच्या हाताला घासून गोळी गेली.

हेही वाचा:- सरदार पटेल महाविद्यालयात अज्ञात चोरट्यांनी बॅग आणि मोबाईल केला लंपास

दि.‌ ११ मे च्या सायंकाळच्या दरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मूल शाखेच्या परिसरात ही घटना घडली. गोळीबार करणारा अज्ञात असून तो फरार आहे. अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे. संतोष रावत यांच्यावर गोळीबार का करण्यात आला? कोणत्या हेतूने करण्यात आला? कोणी केला? की हा गोळीबार कुणी घडवून आणला? या प्रश्नाचे उत्तरे मात्र अनुत्तरीत आहे


गोळीबाराचा सीसीटीव्ही फुटेज आले समोर

मूल शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने