Chandrapur Police : गुन्हेगारांना पोलिसांचा 'खाक्या',५२८ उपद्रवींवर प्रतिबंधात्मक कारवाई!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिस दलाने धडक मोहीम हाती घेतली आहे.

प्रिव्हेन्टिव्ह ऍक्शन कॅम्पच्या माध्यमातून गुन्हेगारीपार्श्वभूमी असलेल्यांवर पोलिसांचा चाबूक फिरत असून, जिल्ह्यातील तब्बल ५२८ उपद्रवी इसमांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलिhस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील सर्व उपविभागांमध्ये हे विशेष कॅम्प आयोजित केले जात आहेत. या मोहिमेअंतर्गत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १२६ आणि १२९ अन्वये संशयित व असामाजिक तत्त्वांवर कारवाईचा धडाका लावला आहे.


वरोरा उपविभागः - २२०

चंद्रपूर उपविभागः - १३५

राजुरा उपविभागः - ७४

चिमूर उपविभागः- ९९

एकूण : -- ५२८