नागपूर:- विदर्भातील युवा नेते हर्ष शिव यांनी आपल्या समर्थकांसह अधिकृतपणे शिवसेना (शिंदे गट) युवासेनेत प्रवेश केला आहे. नागपुरात पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.
युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या उपस्थितीत हा महत्त्वाचा पक्षप्रवेश पार पडला. हर्ष शिव यांचा विदर्भातील तरुणांमध्ये असलेला दांडगा प्रभाव आणि त्यांच्या पाठीशी असणारा मोठा समर्थकवर्ग यामुळे युवासेनेत आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आगामी काळात विदर्भातील युवा वर्गाला अधिक मजबूत आणि संघटित करण्याच्या दृष्टीने या प्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
पक्षप्रवेशानंतर बोलताना हर्ष शिव यांनी, मिळालेल्या नवीन जबाबदारीचे स्वागत करत युवकांच्या ज्वलंत प्रश्नांवर आणि संघटनात्मक बांधणीवर पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या प्रवेशामुळे विदर्भात युवासेनेची ताकद आणखी वाढणार यात शंका नाही.
