चंद्रपूर जिल्ह्यातील कॉंगेस नेत्यावर गोळीबार #chandrapur #Mul


गोळीबाराचा सीसीटीव्ही फुटेज आले समोरGoogle ads.
मुल:- मुल येथील काँग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर आज अज्ञात इसमानी गोळी झाडली. या घटनेत संतोष रावत यांना कोणतीही इजा झाली नसली तरी त्यांच्या हाताला घासून गोळी गेली. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पुढे आला आहे. यामुळे आरोपीपर्यंत जाण्यासाठी पोलिसांना निश्चित मदत होणार आहे. 

हेही वाचा:-  संतोष रावत यांच्यावर गोळीबार

आज सायंकाळच्या दरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मूल शाखेच्या परिसरात ही घटना घडली. गोळीबार करणारा अज्ञात असून तो फरार आहे. अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे.

संतोष रावत यांच्यावर गोळीबार का करण्यात आला? कोणत्या हेतूने करण्यात आला? कोणी केला? की हा गोळीबार कुणी घडवून आणला? या प्रश्नाचे उत्तरे मात्र अनुत्तरीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत