Top News

सतिश शिंगाडे सरांनी चमकावले विद्यार्थ्यांचं आर्थिक भविष्य #chandrapur #pombhurna #NMMS




Google ads.
पोंभुर्णा:- डिसेंबर 2022 रोजी इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना (एनएमएमएस) या शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल लागून नुकतीच शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थांची निवड यादी जाहीर करण्यात आली . या शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चेक आष्टा शाळेने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा उंच भरारी घेतली आहे.

हेही वाचा:- चेक आष्टा शाळेतील विद्यार्थी चंद्रपूर जिल्ह्यात अव्वल तीनमध्ये

चंद्रपूर जिल्ह्यातून जाहीर झालेल्या मेरीट लिस्ट मध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय जि. प. प्राथ. शाळा चेक आष्टा शाळेतील विद्यार्थांनी पटकावले आहे. कु. वेदिका साईनाथ पावडे ही जिल्हास्तरीय निवड यादीत पहिली आली आहे. तर नयन बंडू पेंदोर यांने द्वितीय व वेदांत सुरेश मडावी यांने तृतीय क्रमांक मिळविला आहे. त्याचप्रमाणे या परिक्षेला इयत्ता आठवीतील अकरा विद्यार्थी बसले होते आणि त्यातील दहा विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले आहेत.

 या यशाचे कारण विद्यार्थ्यांना विचारले असता सांगितले की , शाळेत सतिश शिंगाडे सर एनएमएमएस परिक्षेची पेपर सरावासह संपूर्ण तयारी करून घेतात. दरवर्षी अधिकचे शिष्यवृत्ती वर्ग घेवून त्यांना मार्गदर्शन करणारे सतिश शिंगाडे सर यांचे सुद्धा अभिनंदन केले जात आहे. 

या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती साठी निवड झाली आहे. या यशाचं श्रेय विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडील व व शाळेचे मुख्याध्यापक अरूण यामावार, विनोद पोगुलवार, कु. लाकडे मॅडम, सतिश शिंगाडे यांना दिले आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. #Adharnewsnetwork

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने