Top News

शाळेच्या सभेतच न. प. च्या दोन शिक्षकांमध्ये हाणामारी #chandrapur #ballarpur

बल्लारपूर:- नगरपरिषदेच्या साईबाबा प्राथमिक शाळेत शैक्षणिक सभेदरम्यान दोन शिक्षकांत वादावादीनंतर हाणामारी झाल्याची घटना शनिवारी दि. २७ उघडकीस आली. याप्रकरणी मुखाधिकाऱ्यांनी एका शिक्षकाला निलंबित केले. दिलीप आत्राम असे निलंबित शिक्षकाचे नाव आहे.

बल्लारपूर नगर परिषद प्राथमिक शाळा शिक्षकांची 26 एप्रिल 2024 रोजी साईबाबा प्राथमिक शाळेत सभा आयोजित करण्यात आली होती. सभेत शैक्षणिक विषयांवर चर्चा झाली. दरम्यान, दिलीप आत्राम व श्रीनिवास रायला या दोन शिक्षकांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यवसान लाथाबुक्क्यांच्या मारहाणीत झाले. दरम्यान, आरोपी शिक्षक आत्राम यांनी जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार शिक्षक रायला यांनी नगर परिषद मुख्याधिकारी व पोलिस ठाण्यात दिली. यावरून आत्राम यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला तर मुख्याधिकाऱ्यांनी शिक्षक दिलीप आत्राम यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने