चंद्रपूर मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्षावर गोळीबार #chandrapur

Bhairav Diwase
0


चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील आझाद बगीच्या जवळ असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये आज दुपारच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. अमन अंधेवार असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. या गोळीबारात अंधेवार यांच्या पाठीला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथे हलविण्यात आले आहे.


सविस्तर वृत्त असे की, चंद्रपूर शहरातील आझाद बगीच्या जवळ असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांचे कार्यालय आहे. 4 जुलैला दुपारी दिड वाजताच्या सुमारास अंधेवार कार्यालयात येण्यासाठी रघुवंशी कॉम्प्लेक्सच्या लिफ्टजवळ आले. तिथे त्यांनी लिफ्टची बटन दाबली आणि लिफ्टचा दरवाजा उघडण्यापूर्वीच त्यांच्या मागून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. गोळी त्यांच्या पाठीला लागली असल्याने ते जखमी झाले. चंद्रपूरात प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथे हलविण्यात आले आहे.



घटनास्थळी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व त्यांची टिम पोहचली असून घटनेचा तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)