चंद्रपूर:- सरदार पटेल महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागातर्फे प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाला केंद्र सरकारच्या पीएम उषा योजनेअंतर्गत पाच कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून महाविद्यालयात विविध सॉफ्ट स्किल ऍक्टिव्हिटी राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत रसायनशास्त्र विभागातर्फे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी मार्गदर्शन करण्यासाठी गव्हर्मेंट विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड ह्युमॅनिटी अमरावती येथील भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. विजया सुनील संगावार मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी पॉलिमर केमिस्ट्री व पेटंट याबद्दल दृकश्राव्य माध्यमातून महत्त्वाची माहिती दिली.प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट, बायोडिग्रेडेबल पॉलिमर, पॉलिमर नॅनो पार्टिकल्स फॉर मेडिकल एप्लीकेशनस, पॉलिमर नॅनो कंपोझिट या विषयावर लोकहितास्तव महत्त्वाचे उपयुक्त व पर्यावरण संरक्षणाशी संबंधित आणि सर्वसामान्यांना लाभ होईल असे नावीन्यपूर्ण संशोधन कार्याला भारत सरकारकडून चार पेटंट पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. पेटंट हा शोधासाठी दिलेला एक विशेष अधिकार आहे. पेटंट शोध कर्त्याना त्यांच्या शोधांना कायदेशीर संरक्षण देऊन त्यांना फायदा देतात. तथापि, पेटंटमुळे या शोधाबद्दलची तांत्रिक माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध करून देऊन आणि अशा प्रकारे उपक्रमाला गती देऊन समाजालाही फायदा होतो.
तसेच कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (सिपेट) येथे नेण्यात आले होते. संपूर्ण भारतात प्लास्टिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी तसेच प्लास्टिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विशेष तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मनुष्यबळ विकासाचे काम करत आहे अशी माहिती प्राध्यापक पुष्कर देशमुख सिपेट चंद्रपूर यांनी दिली.
कार्यशाळेच्या तिसऱ्या दिवशी प्लास्टिक कचऱ्याचे पुनर्वापर यावर डॉ. बी. डी. पालीवाल एम. बी. बी. एस., एम. डी., (भुलतज्ञ) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी प्लास्टिकचा कचरा वापरून तयार केलेल्या शीट्स प्रत्यक्षात दाखविल्या.
महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे विद्यार्थी प्रत्यक्ष कार्यशाळेत सहभागी झाले व विविध प्रात्यक्षिकाचा स्वतः अनुभव घेतला. केंद्र सरकारच्या या योजनेचा उद्देश मुलांमध्ये विविध कौशल्य निर्माण व्हावेत व ते रोजगार सक्षम व्हावेत असा आहे.
कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार आणि समन्वयक प्राध्यापक सुनील चिकटे यांच्या माध्यमातून करण्यात आले.रसायनशास्त्र पदव्युत्तर विभागातील विद्यार्थिनी कल्याणी वैरागडे यांनी संचालन, तर आभारप्रदर्शन लक्ष्मी भट्टी हिने मानले.
रसायनशास्त्र विभागातील डॉ. दिलीप वाहणे, डॉ. निरेन कठाळे, डॉ. वंदना खनके, डॉ. रक्षा धनकर, अमरीन शेख, अन्वरूननिसा शेख, पायल डांगे, करिश्मा सय्यद, चेतना गवालपंछी, अर्चना राय, आकांक्षा बोंमकंटीवर तसेच रसायनशास्त्र विभागातील शिक्षकेत्तर कर्मचारी राहुल येलमुले, राजेश इंगोले, शिल्पा ठोंबरे, भारती वासेकर, हरिदास देठे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी रसायनशास्त्र विभागातर्फे आयोजित या उपक्रमाबाबत संस्थेचे अध्यक्ष माननीय अरविंद सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्री सुदर्शन निमकर, कार्याध्यक्ष श्री किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष श्रीमती सगुनाताई तलांडी, संस्थेचे सचिव श्री प्रशांत पोटदुखे, कोषाध्यक्ष श्री संदीप गड्डमवार व इतर सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.