राजुरा मधील सततच्या विजेचा लपंडाव कधी बंद होणार- सुरज ठाकरे

Bhairav Diwase
राजुरा मधील सततच्या विजेचा लपंडाव कधी बंद होणार- सुरज ठाकरे


राजुरा- सविस्तर वृत्त असे की, वारा तुफान असो वा नसो परंतु राजुरा तालुक्यासह राजुरा शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून वीज पुरवठा सतत खंडित होण्याची गंभीर समस्या ही आजही कायमचं आहे. ही समस्या केवळ एक तात्पुरती असुविधा नसून, स्थानिक रहिवाशांच्या दैनंदिन जीवनावर , अर्थव्यवस्थेवर आणि विकासावर विपरीत परिणाम करणारी आहे. बहुतांश सर्वत्र कामे शासनाने ऑनलाइन पद्धतीने करणे अनिवार्य केले मात्र सतत विजेच्या लपंडामुळे शालेय तथा शासकीय आणि खाजगी विभागांची होणारे ऑनलाईन कामे वीज खंडित झाल्यावर वायफाय कनेक्शन बंद होत असल्याने संगणकाच्या माध्यमातून होणाऱ्या कामांमध्ये अडचणी निर्माण होत असल्याने स्थानिक नागरिकांना याचा नाहक त्रास दररोज सहन करावा लागतो. गेल्या वर्षानुवर्षे ही स्थिती कायम असून, स्थानिक वीज उपकेंद्रातील अपुरा देखभाल, ओव्हरलोड ट्रांसफार्मर किंवा अपुरा वीज उत्पादक यामुळे ही समस्या उभत्वत असल्याचे दिसून येते. या समस्या मुळे त्रास ज्यामध्ये 
आरोग्य आणि सुरक्षा : रात्रीच्या वेळी अंधारामुळे अपघाताचा धोका वाढतो. रुग्णालय आणि वैद्यकीय सुविधांमध्ये वीज नसल्याचे जीवितहानीचा धोका निर्माण होतो. 



रहिवाशांवर होणारे परिणाम : विद्यार्थीच्या अभ्यासात व्यस्त व्यत्यय येतो, विशेषता परीक्षेच्या काळात घरगुती उपकरणे खराब होतात आणि पाणीपुरवठा प्रणाली प्रभावित होते.

आर्थिक नुकसान : शेतकरी छोटे व्यवसायिक आणि उद्योजकांना यांचा मोठा फटका बसतो सिंचन पंप दुकाने आणि कारखाने बंद पडतात, ज्यामुळे उत्पादकता कमी होते आणि उत्पन्नावर परिणाम होतो. राजुरा हे ग्रामीण भाग असल्याने येथील अर्थव्यवस्था मुख्यतः शेती आणि छोट्या उद्योगावर अवलंबून आहे. ज्यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनते. 
करिता या समस्येचे निवारण करण्याकरिता आज दिनांक:- १२ नोव्हेंबर २०२५ ला जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये संघटनेचे युवा शहर अध्यक्ष श्री. रोहीत बत्ताशंकर व संघटनेचे सहकारी यांनी राजुरा तालुक्यातील वीज उपकेंद्राचे आधुनिकीकरण आणि क्षमता वाढून या समस्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याकरिता राजुरा येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी या कार्यालयामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळेस संघटनेचे उपस्थित पदाधिकारी तथा सहकारी श्री. रोहित बत्ताशंकर, राजु लड्डा, श्रावण साळवे, अतुल सिंग, साहिल कायडिंगे, चेतन मेश्राम, बालाजी चौधरी, ऋतुज जुलमे, आर्यन दुबे आधी उपस्थित होते.
Tags